सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आंदुर्ले येथील मिताली परब हिचे मा.आ. वैभव नाईक यांनी केले अभिनंदन


         कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावची सुकन्या मिताली हर्षिता हरिश्चंद्र परब हिने सनदी लेखापाल (चार्टर्ड अकौंटंट) या परीक्षेत उत्तीर्ण होत उज्ज्वल यश संपादन केले आहे. मितालीने मिळविलेल्या या यशाबद्दल शनिवारी माजी आमदार वैभव नाईक यांनी तिच्या निवासस्थानी भेट देऊन अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, संतोष पाटील, पूजा सर्वेकर, ऍड. आनंद परब, अजित सर्वेकर, वृषाली तोरसकर आदी उपस्थित होते.

मिताली ही सामान्य कुटुंबातील असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. मितालीने केवळ जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने हे यश संपादन केले आहे. मितालीने अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून तिने भरतनाट्यम विशारदही पदवी सुद्धा प्राप्त केली आहे. विधीज्ञ आनंद परब यांची मिताली ही पुतणी मिताली आहे. 
       
यावर्षी देशपातळीवर घेतलेल्या चार्टर्ड अकौंटंट या परीक्षेचा निकाल १३.४४ टक्के एवढ्या अल्पटक्केवारीत लागला असून संपूर्ण देशभरातून केवळ ११ हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ज्यामध्ये मिताली हिचा समावेश आहे ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.