भारतासह संपूर्ण जगात कुंभमेळा प्रसिद्ध आहे. महाकुंभमेळा दर 12 वर्षांनी येत असतो. यंदा जानेवारी 2025 मध्ये कुंभमेळा आला आहे. त्यापूर्वी 2013 मध्ये कुंभमेळा पार पडला होता. प्रयागराज शहरात महाकुंभमेळा 2025 ची तयारी पूर्ण क्षमतेने सुरू आहे. शहरात 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत महाकुंभमेळा 2025 आयोजित केला जाईल.
भारतातील चार पवित्र नद्या आणि चार तीर्थस्थानांवर आयोजित केला जातो. 2025मध्ये 13 जानेवारीला पौष पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे. त्याचा समारोप 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी होईल. 12 वर्षानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ होणार आहे. शाही स्नानांचे महत्त्वपूर्ण दिवस पौष पौर्णिमा, मकर संक्रांती, मौनी अमावस्या, वसंत पंचमी आणि महाशिवरात्री आहेत. यापूर्वी 2013मध्ये प्रयागराजला महाकुंभ मेळावा पार पडला होता. नागा साधू या कुंभ मेळ्याला हजेरी लावतात. नागा साधू या मेळाव्याचं खास आकर्षण आहेत.