‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जानेवारीला उद्घाटन, देशभरातून एक हजार स्टार्टअप्सचा सहभाग


कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation, Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

 महाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील १००० स्टार्टअप या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

दिवसभरात होणाऱ्या पॅनेल चर्चांमध्ये गुंतवणूकदारांच्या गरजा आणि युवा उद्योजकांच्या यशकथा यावर विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरही कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.