महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी दीपक कुडाळकर आणि जिल्हा संघटक पदी राजेश माने यांची नियुक्ती


महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या 
जिल्हा कार्यकारिणी लवकरच होणार विस्तार

गेली २० वर्षे समाजातील विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत त्याची तड लावणारी संघटना हा महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा लौकिक राहिला आहे. महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, बेरोजगार, कर्जदार, कामगार, जामिनदार, आर्थिक फसवणूक झालेला महिला वर्ग यांना न्याय देण्यात ही संघटना अग्रेसर राहिलेली आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रात यावेळी संघटनेच्या कार्यकारीणीची पुन:रचना करण्यात येत असून सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी दीपक कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड.प्रसाद करंदीकर यांनी सांगितले.

 दीपक  कुडाळकर हे महाराष्ट्रातील एक सर्वोत्तम मोटिव्हेशनल ट्रेनर मानले जात असून मागील अनेक वर्षे ते लोकाधिकार समितीचे सक्रिय काम करत आहेत. राजेश माने हे भारतीय आयुर्वेदाचे अभ्यासक असून या क्षेत्रातील यशस्वी उद्योजकही आहेत. आरडब्ल्यूजी या उद्योगसमूहाच्या माध्यमातुन आरोग्य आणि युवारोजगार या संकल्पनेतून ते कार्यरत आहेत. अनेक सामाजिक संघटनांच्या कामातून त्यांचा समाजाशी सततचा संपर्क राहिलेला असून लोकांच्या प्रश्नांना योग्य न्याय देता यावा यासाठी लोकाधिकार समितीच्या माध्यमातुन मजबूत संघटना बांधणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लवकरच अध्यक्ष दीपक कुडाळकर आणि संघटक राजेश माने हे संयुक्तरित्या जिल्हा दौरा करणार असून त्यानंतर जिल्हा कार्यकारिणी घोषित करणार येणार असल्याचे समजते. या नियुक्ती कार्यक्रमाच्या वेळी समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड प्रसाद करंदीकर यांच्यासमवेत लोकाधिकार समितीचे राज्य समन्वयक अविनाश पराडकर, सह-सचिव डॉ.कमलेश चव्हाण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.