सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील सावरवाड येथील शिवमंदिरात शिव भक्तांनी आज सकाळ पासून रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टचे सर्वेसर्वा रुद्रराज यांच्या पौराहित्याखाली धार्मिक विधीव्दारे महाशिवरात्रीचा जागर करीत आनंद लुटला.
दरम्यान, या उत्सवाला सावंतवाडी संस्थांचे लखमसिह राजे, राष्ट्रवादी पवार गट च्या अर्चना घारे ,नकुल पार्सेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर अवधूत मालंडकर यांच्यासह इतर शिवभक्तांनी उपस्थिती दर्शविली
सावरवाड येथील अलीकडेच नव्याने बांधण्यात आलेल्या रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टच्या शिव मंदिरात गेले दोन दिवस महाशिवरात्री निमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कालपासून सुरु झालेल्या या उत्सवाला सावरवाडच्या शिव मंदिराला शेकडो भाविकांनी भेट दिली. काल शिव धारनेवर आधारीत अनेक यज्ञ आणि वेद पठण, रुद्राभिषेक, महामृत्युंजय मंत्र हे विधी पार पडले होते. आज महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासून या शिव मंदिरात धार्मिक विधिना प्रारंभ झाला.
यामध्ये सकाळच्या सत्रात रुद्राभिषेक, शिव यज्ञ, अखंड वेदोपचार पाठ, वेद मंत्र पठण यामध्ये रुद्रसूक्त, श्रीसूक्त, दुर्गासूक्त, मेधासूक्त, शिव संकल्प सूक्त आणि रुद्रीपाठ असे कार्यक्रम पार पडले. तर दुपारी स्पटिकाच्या शिवलिंगाला चंदन आणि केशरचा लेप देत दुग्दभिषेक व जलाभिषेक केला. संध्याकाळी सौदळे देवगड येथील ढोल पथकाच्या सहाय्याने शिव भक्तांनी शिव नामाचा जयघोष करीत नृत्य सादर केले. रात्रौ रागोत्सव हा कार्यक्रम पार पडला यावेळी शिव भक्त व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.