आता अनुभवा नरेंद्र सफर


सावंतवाडीचा नरेंद्र डोंगर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अभिमानास्पद वनवैभव ! याच नरेंद्र डोंगराची सफर करणे आता वनविभागामुळे शक्य होणार आहे.सिंधुरत्न योजनेतून नरेंद्र वन उद्यान येथे निसर्ग पर्यटन सुविधांचा आनंद आता पर्यटकांना अनुभवणे शक्य होणार आहे

अशी असेल नरेंद्र वन सफर

पर्यटकांना मोती तलावा शेजारी असलेल्या जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान ते नरेंद्र वन उद्यानापर्यंत जाण्यासाठी सफारी वाहनाने प्रवास करता येईल. 

नरेंद्र वन उद्यानामध्ये पोहोचल्यावर तिथे असलेला सावंतवाडी दर्शन मनोरा, निसर्ग माहिती केंद्र हे देखील पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे. 

जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान ते नरेंद्र डोंगर प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेले सफारी वाहन प्रत्येक 2 तासाच्या अंतराने सकाळी 8 वाजता, 10 वाजता, 12 वाजता, दुपारी 2 वाजता, सायंकाळी 4 वाजता व शेवटची फेरी सायंकाळी 6 वाजता या वेळापत्रकानुसार सोडले जाईल. 

या नरेंद्र डोंगर सफारीसाठी भोसले उद्यान ते नरेंद्र डोंगर सफारी चार्जेस, गाईड चार्जेस व निसर्ग माहिती केंद्र प्रवेश फी हे सर्व मिळून एकत्रितरित्या प्रौढांसाठी 100 रु. प्रति व्यक्ती तर 14 वर्षांखालील लहान मुलांसाठी 50 रु. शुल्क करण्यात येणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनी आणि त्याचसोबत जिल्हावासियानीही या  निसर्ग पर्यटनाचा नक्की अनुभव घ्यावा असे सावंतवाडी वन विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.