माय माऊली महिला सबलीकरण संस्था मालवण महिला आघाडीची स्थापना, अध्यक्षपदी सौ फॅनी फर्नांडिस यांची निवड


मालवण मधील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मातृत्व आधार फाउंडेशन या संस्थेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध स्तरावर काम करण्यासाठी मातृत्व आधार फाउंडेशन संलग्न माय माऊली महिला सबलीकरण संस्था  मालवण या महिला आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीच्या अध्यक्षपदी सौ  फॅनी फर्नांडिस व सचिवपदी सौ. मिताली मोंडकर यांची निवड करण्यात आली.

आज महिला पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात काम करत असल्या तरी  अजूनही शहराबरोबरच गावा गावात महिलांच्या काही समस्या, अडचणी, काही ठिकाणीं दुर्बलता पहावयास मिळते. यासाठी मालवण मधील मातृत्व आधार फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली महीला दिनाच्या निमित्ताने वायरी येथील माजी जि. प. सदस्या सौ. श्रमिका संतोष लुडबे यांच्या निवासस्थानी महीला आघाडीची स्थापना करण्यात आली. या महिला आघाडीच्या माध्यमातून समाजातील महिलांसाठी स्वस्त धान्य बँक, शिवाय महिलांच्या आर्थिक, सामाजिक, आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी विविध मान्यवरांच्या मदतीने काम करण्यात येईल, असे एकमताने ठरवण्यात आले. या महिला आघाडीचे नाव माय माऊली महीला सबलीकरण संस्था मालवण असे ठरवले गेले.

या महिला आघाडीची निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - अध्यक्षा- सौ. फॅनी फर्नांडिस, उपाध्यक्षा- सौ. वैशाली शंकरदास,
खजिनदार- सौ. राधिका मोंडकर, सचिव- सौ. मिताली मोंडकर, सहसचिव-  सौ. दिक्षा गावकर, सहखजिनदार,-  सौ. मनीषा गावकर सल्लागार- सौ. निलिमा रावले, सौ. श्रमिका सं. लुडबे, सौ. गौरी सातर्डेकर, सौ. रविना लुडबे, म्यारलिन मेंडिस.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.