दिल्ली येथे १७ ते २० मार्च दरम्यान होणाऱ्या स्टार्टअप महाकुंभ एक्स्पोजर व्हिजिटसाठी महाराष्ट्र स्टार्टअप इनोव्हेशन सोसायटी, महाराष्ट्र शासन यांच्याकडून मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी निकिता शर्मा आणि महेक शेख यांची निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी त्यांची महाराष्ट्र स्टार्टअप इनोव्हेशन सोसायटीने आयोजित केलेल्या स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत निवड झाली होती. त्यांच्या प्रकल्पासाठी शासनाने १ लाख रुपये बीज भांडवल मंजूर केले आहे. या प्रकल्पासाठी त्यांना डॉ. सुमेधा नाईक आणि प्राचार्य डॉ. शिवराम ठाकुर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, विकास समितीचे अध्यक्ष अॅड. समीर गवाणकर, सचिव चंद्रशेखर कुशे व संस्था पदाधिकारी यांचे सहाय्य लाभले आहे.