Mumbai Division Job Fair: ठाणे, कोकण आणि मुंबईकरांसाठी बेलापूर येथे शासनाचा 10 जानेवारी रोजी रोजगार मेळावा

नवी मुंबई बेलापूर येथे शासनाच्या वतीने मोठा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा केवळ मुंबईसाठी नसून, मुंबई सह नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवार देखील या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे ही अनेकांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे.मुंबई डिव्हिजन अंतर्गत ही महाभरती होणार आहे.

त्यामध्ये विविध संवर्गातील ४०० हून अधिक रिक्त पदांचे प्रयोजन आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणार्‍या मुंबई आणि आजुबाजूच्या जिल्ह्यातील तरुणांसाठी ही पर्वणी आहे. नवी मुंबई येथील बेलापूर येथे बुधवारी १० जानेवारी २०२४ रोजी या रोजगार मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमा अंतर्गत आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार योजनेद्वारे हा मेळावा होणार आहे. महाराष्ट्र शासनाने अधिकाधिक तरुणांना रोजगार देण्याचे ध्येय बाळगून या योजनेची आखणी केली आहे.

राज्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करीत आहेत. त्याचसाठी हा मेळावा आयोजित करून शासन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे.तरुणांचे केवळ शिक्षण होऊन चालणार नाही तर त्यांना उत्तम संधीही मिळायला हव्या. देशासह राज्यामध्ये सध्या बेरोजगारीची मोठी समस्या आहे. म्हणूनच त्यावर ठोस उपाय करण्याच्या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमासोबतच पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार योजना (जागेवरच निवड) राज्यात राबवली जात आहे.

ज्याद्वारे शासन जिल्हया-जिल्ह्यात पोहोचत आहे. विशेष म्हणजे या मार्फत हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळत आहे.या मेळाव्यात विविध प्रतिष्ठित कंपन्या सहभागी होणार असून चारशेहून अधिक उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या मेळाव्यामध्ये सेल्स, सीएनसी ऑपरेटर, आयटीआय फिटर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, इंटर्नशिप, ग्राफिक डिझायनर, मार्केटिंग, टर्नर, फिटर या आणि अशा अनेक पदांचा समावेश आहे.

या मेळाव्यात ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाईल.तसेच 'रोजगार महास्वयम' या लिंकवर क्लिक करून होम पेज वरील 'मुंबई डिव्हिजन' पर्यायावर क्लिक करावे. तिथे भरतीचे आणि पदांचे सर्व तपशील प्राप्त होतील.

रोजगार मेळाव्याची तारीख : १० जानेवारी २०२४मेळाव्याचा पत्ता: इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इंस्टिट्यूट, आग्रोली, सेक्टर २९, बेलापूर, नवी मुंबई.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.