राज्यात ५ डिसेंबरपासून ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जवाहर बालभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, निर्णय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.