#navy_day_2023 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर, पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेची करणार पाहणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नौदल दिनाच्या तयारीची आता अवघ्या देशभर चर्चा होऊ लागली आहे. पंतप्रधान , राष्ट्रपती यांच्यासोबत देशभरातील अतिमहनीय व्यक्ती तसेच नौदल आणि सैन्यातील वरिष्ठ अधिकारी मालवण येथे दाखल झाले आहेत. 

पंतप्रधान यांच्या मालवण दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार दि. ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून मालवणातील कार्यक्रम स्थळाची ते पाहणी करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा पुढीलप्रमाणे असेल.  गुरुवार दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने राजकोटकडे प्रयाण. दुपारी ३.३० वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारी पाहणी. सायंकाळी ४ वाजता मोटारीने चिपी विमानतळ सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. ४.३० वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारीबाबत बैठक. स्थळ:- चिपी विमानतळ जि. सिंधुदुर्ग सायं. ५.१५ वाजता चिपी विमानतळ येथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.