अपरांत साहित्य कला प्रबोधिनी सिंधुदुर्ग शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची तर कार्याध्यक्षपदी अनिल जाधव तर सरचिटणीपदी राजेश कदम आहेत. येथील गोपुरी आश्रमाच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया झाली.
कार्यकारीणीच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्षपदी प्राचार्य सिद्धार्थ तांबे (कणकवली), भरत नाईक (देवगड), प्रफुल्ल जाधव (वैभववाडी), सगुण मातोंडकर (वेंगुर्ले), बुधाजी कांबळे (सावंतवाडी), प्रकाश तेंडोलकर (दोडामार्ग), प्रा.संतोष वालावलकर (कुडाळ) आणि राजेंद्र कदम (मालवण) यांचा समावेश आहे. तर सहचिटणीसपदी सरिता पवार, कोषाध्यक्षपदी जनीकुमार कांबळे, हिशेब तपासणीस प्रकाश जाधव, जिल्हा संघटक सूर्यकांत चव्हाण, सल्लागारपदी प्राचार्य युवराज महालिंगे, गोपीकृष्ण पवार यांचा समावेश आहे. इतर सदस्यांमध्ये सुनील जाधव, रूपाली कदम, दीपक तळवडेकर, उत्तम जाधव, राजेंद्र कदम. नूतन जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीस निरंतर सहयोग राहील, असे मत व्यक्त करून प्रबोधिनीच्या वैचारिक, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्याच्या प्रत्येक उपक्रमांना जिल्हा कार्यकारिणीचे सहकार्य राहिल, असे प्रतिपादन केले. जिल्हा कार्यकारिणीचे सरचिटणीस राजेश कदम यांनी आभार मानले.