‘किशोर’च्या 'मूलभूत जीवन कौशल्य' दिवाळी अंकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

शालेय शिक्षण विभागांतर्गत बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या 'किशोर' मासिकाच्या 'मूलभूत जीवन कौशल्य' या दिवाळी अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 


मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, त्यांना पुस्तकाबाहेरील ज्ञान मिळावे, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्या कोवळ्या मनावर उत्तम मूल्यसंस्कार व्हावेत या उद्देशाने गेली 52 वर्षे ‘बालभारती’च्या वतीने ‘किशोर' हे मासिक प्रकाशित केले जाते. 'किशोर'चा दिवाळी अंक हा नेहमीच आकर्षक आणि नाविन्यपूर्ण राहिला आहे. 

यंदाचा किशोरचा दिवाळी अंक 'मूलभूत जीवन कौशल्य' या विषयावर आधारलेला आहे. बालवयीन आणि किशोरवयीन मुले अंगभूत बळ, आत्मविश्वास, धाडस यांच्या आधारे संकटांना कशी सामोरी जाऊ शकतील, या प्रश्नाचा वेध कथा, कविता, लेख आणि खेळ अशा माध्यमांतून या अंकात घेण्यात आला आहे. किशोरच्या परंपरेनुसार अंकात अनेक मान्यवरांनी दर्जेदार आणि मनोरंजक लेखन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.