भारतीय महिला क्रिकेट संघात मालवण तालुक्यातील आंबडोस गावची सुकन्या प्रकाशिका प्रकाश नाईक हिची निवड झाली आहे.
शाळा स्तरापासून क्रिकेट खेळाची आवड असलेल्या प्रकाशिका हिने उत्तरोत्तर प्रगती साधली आहे. सुरुवातीला भारताच्या १९ वर्षांखालील महिलांच्या संघात स्थान प्राप्त केल्यानंतर ती मुंबई महिला संघाची उपकर्णधार झाली होती.
नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय टी-२० महिला क्रिकेट स्पर्धेत तिने मुंबई संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.