भाजप नेते आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी मागील काही वर्षांपासून सामाजिक दातृत्व आणि आधाराची निर्माण केलेली नेतृत्वशक्ती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपुर्ण कोकणपट्यात आधारवड बनत आहे. यंदाच्या दिवाळीत विशाल परब यांची हीच सामाजिक दातृत्वाची गोष्ट खऱ्या अर्थाने अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ठरली आहे.
नरकचतुर्थी अर्थात दिवाळी च्या पहाटेला शिरोडा केरवाडी येथील मच्छीमार प्रवीण उर्फ गोटया भरत परब यांच्या मच्छीमार व्यवसायासाठी ठेवलेल्या शेड मधील जाळया,होडी व इतर साहित्य याला आकस्मित आग लागून लाखोचे नुकसान झाले होते या संदर्भात भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब व प्रथमेश तेली यांनी घटनास्थळी भेट दिली. घडलेल्या परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता विशाल परब यांनी तात्काळ परिस्थिती ची माहिती घेऊन त्यांना आर्थिक मदत केली.
दुरदुष्टीचा नेता अशी ओळख असणाऱ्या विशाल परब यांनी काही मोठी पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. मच्छिमार व्यवसाय साहित्याच्या वारंवार होत असलेल्या चोऱ्या व जाळपोळ सारख्या घटना टाळण्यासाठी जेटी जवळ CC TV ची व्यवस्था करण्या विषयीचे आश्वासन देण्यात आले , मच्छिमार समाजाला व्यवसाय अंतर्गत नुकसान भरपाई साठी कोणत्याही प्रकारचे शासकीय किंवा विमा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने याविषयी मत्स्यविकास मंत्री यांच्याशी बोलून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले .
विशाल परब आणि प्रथमेश तेली या नव्या दमाच्या युवा नेत्यांवर भाजपने मोठी जबाबदारी सोपवत सध्या संघटना बांधणीकडे वेगाने लक्ष दिलं आहे. जनसामान्यांपर्यंत पक्षाची धोरणे पोहोचवताना सामाजिक मदत आणि भविष्यकालीन उपाययोजना याकडे विशाल परब नियोजनात्मक लक्ष देत असल्याने जनसामान्यांचा पाठिंबा वाढत आहे. शिरोडा घटनाच्या निमित्ताने संपुर्ण किनारपट्टीवर संरक्षणात्मक नियोजनासाठी लवकरच वरिष्ठ नेत्यांची भेट घेत विशेष आर्थिक निधीच्या तरतूदीची मागणी करणार असल्याचे यावेळी विशाल परब यांनी म्हटले आहे.