सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा पुरस्कार…



देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत जिल्हा सहकारी बँका गटात  सभासद ठेवी गोळा करण्यामध्ये गुणवत्तापूर्वक काम करणाऱ्या बँकेला 'बँको ब्लु रिबन' पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले. रिझर्व बँकेचे माजी महाप्रबंधक पी के अरोरा यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस दमण येथे बँको पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँक कर्मचारी संचालक देवेंद्र धुरी सुनील फणसेकर,बँक अधिकारी निलेश कनयाळकर यांनी स्वीकारला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.