मेरी मिट्टी मेरा देश - दिल्लीत विशाल परब आणि प्रथमेश तेलींसह कोकणच्या भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचा जल्लोष

     दिल्लीतील कार्यक्रमात चमकले कोकणचे युवा नेते 
    

मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमाची अवघ्या देशभर चर्चा आहे. दिल्लीत या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात कोकण विभागातून भाजप युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेले विशाल परब आणि प्रथमेश तेली यांनी कोकणातील भाजपच्या युवक कार्यकर्त्यांसह दिल्लीमध्ये जल्लोषपुर्ण राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेतून कलश सुपुर्द केला आहे.

महाराष्ट्र भाजप युवा प्रदेश मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विशाल परब आणि प्रथमेश तेली यांनी कोकणात पक्षविस्तार कार्यक्रम करण्यास सुरुवात केले आहेत. आज दिल्लीमध्ये जात हा कार्यक्रम सादर करत भाजप पक्ष वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.यावेळी कोकण प्रांतातील भाजपच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांना दिल्लीमध्ये कलश नेत त्यांनी हा उपक्रम साजरा केला आहे. यावेळी शेकडो भाजपचे कार्यकर्ते कोकणातून दिल्ली येथे दाखल झाले होते. 




विशाल परब आणि प्रथमेश तेली यांच्या या उपक्रमावेळी  राज्यस्तरीय नेत्यांनीही उपस्थिती लावली होती. भाजप प्रदेश युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, प्रदेशचे कोकण प्रभारी प्रयास भोसले, यांच्यासमवेत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.