महाराष्ट्राची लेक होणार लखपती, प्रत्येक मुलीला मिळणार एक लाख एक हजार


राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी 
शिंदे सरकार राबवणार लेक लाडकी योजना

राज्यातील मुलींना १ लाख १ हजार रुपयांचा लाभ 
देणाऱ्या योजनेस शिंदे सरकारची मंजूरी 

शिक्षणापासून सज्ञान होईपर्यंत
मुलींना मिळणार सरकारचं पाठबळ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य प्रगतीपथावर नेताना सर्वसामान्य जनता हाच प्राधान्यक्रम ठेवत अनेक महत्वाच्या योजनांची तात्काळ अंमलबजावणी सुरु केली आहे. जनआरोग्य योजनेपासून ते बळीराजासाठी पिक विमा योजनेपर्यंत प्रत्येक वेळी सामान्य माणसाला आधार देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शासन निर्णयातून केले आहे. अशाच एका महत्वाकांक्षी योजनेची अर्थसंकल्पात घोषणा करत महाराष्ट्रातील मुलीना सक्षमीकरणासाठी त्या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये २०२३-२४ चा अर्थसंकल्प जाहीर करताना लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आली होती. ज्या अंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे.  ही योजना महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी वरदान ठरणार आहे. ज्या अंतर्गत गरीब पात्र मुलींना 18 वर्षे पूर्ण झाल्यावर ₹ 75000 ची रोख रक्कम देण्यात येणार आहे.


● अशी आहे राज्य सरकारची लेक लाडकी योजना 

लेक लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींना शिक्षणाची सुवर्णसंधी मिळणार 

चांगले शिक्षण मिळाल्याने गरीब मुलींनाही रोजगाराच्या नवीन संधी मिळणार 

या योजनेंतर्गत गरीब कुटुंबात मुलीच्या जन्मावर  5000 देण्यात येतील

जेव्हा मुलगी चौथ्या वर्गात प्रवेश घेते तेव्हा तिला  4000 ची रक्कम देण्यात येतील

जेव्हा मुलगी सहाव्या वर्गात प्रवेश घेते तेव्हा तिला 6000 रुपये देण्यात येतील

जेव्हा मुलगी 11वी मध्ये प्रवेश घेते तेव्हा तिला 8000 देण्यात येतील 

जेव्हा लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे होईल, तेव्हा तिला पुढील अभ्यासासाठी 75000 ची एकरकमी रोख रक्कम देण्यात येईल 

★ १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याचप्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार

महिला सक्षमीकरणाला बळकटी देताना मुलींच्या शिक्षणापासूनच ही सुरुवात करणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच आपल्या पहिल्याच  अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली होती. त्याला मूर्त रुप देत आता शिंदे सरकारने आश्वासनपूर्ती करत राज्यातील शिक्षणाची स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकींच्या पंखाना आता नवं आभाळ दिलय

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.