मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा ?


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा?
मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र.: ८६५०५६७५६७
Email:- aao.cmrf-mh@gov.in 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
१.अर्ज विहीत नमुन्यात
२.निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.
३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला. रु.१.६०.लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 
४. रुग्णाचे आधारकार्ड महाराष्ट्र राज्याचे लहान बाळासाठी बाल रुग्णांसाठी आईचे आधारकार्ड आवश्यक
५.रुग्णाचे रेशनकार्ड महाराष्ट्र राज्याचे
६.संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे
७.अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.
८.प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ-शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
९.रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी. 
अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात वाचनीय पाठवावी. 
Email:- aao.cmrf-mh@gov.in 
व त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत. 
■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे
१.कॉकलियर इम्प्लांट  वय वर्ष-०२-ते-०६,
२.हृदय प्रत्यारोपण
३. यकृत प्रत्यारोपण
४. किडणी प्रत्यारोपण
६. बोन मॅरो प्रत्यारोपण
५. फुफ्फुस प्रत्यारोपण
७. हाताचे प्रत्यारोपण
८. हिप रिप्लेसमेंट
९. कर्करोग शस्त्रक्रिया
१०.अपघात शस्त्रक्रिया
११.लहान बालकांचे शस्त्रक्रिया
१२.मेंदूचे आजार
१३.हृदयरोग
१४.डायलिसिस
१५.अपघात
१६.कर्करोग-केमोथेरपी/ रेडिएशन
१७.नवजात शिशुंचे आजार
१८.गुडघ्याचे प्रत्यारोपण
१९.बर्न रुग्ण
२०.विद्युत अपघात रुग्ण 
या अशा एकूण-२०-गंभीर आजारांसाठी उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र.: ८६५०५६७५६७
संपर्क क्र.०२२-२२०२६९४८ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत.असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व रुग्णालयांची यादी वेबसाईटवर आहे 
 
मंगेश चिवटे, कक्ष प्रमुख,
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी,
मुख्यमंत्री सचिवालय. फोन:-९६१९९५१५१५ संपर्क:-०२२-२२०२५५४०

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.