राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी विशेष विमा योजना, अवघ्या 62 रुपयांत 5 लाखांचे विमा कवच



राज्यातील अकृषी आणि तंत्र विद्यापीठ यांच्याशी संलग्न असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक शुल्कौत अपघाती आणि वैद्यकीय विमा कवच दिले जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील अकृषी विद्यापीठे, तंत्र विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी नव्या स्वरुपात विद्यार्थी जीवन व अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पाच लाखांचा अपघात विमा वर्षभरासाठी केवळ 62 रुपयात मिळणार आहे,


- नेमकी कशी आहे योजना ?

20 रुपये प्रीमियम भरुन एका विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळेल. ही पॉलिसी एका वर्षासाठी लागू असेल. तर 62 रुपये प्रीमियममध्ये याच कालावधीसाठी 5 लाख रुपये कव्हरेज मिळेल. अपघातानंतर उपचारांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल कव्हरेज हवे असल्यास, 422 रुपये प्रीमियम भरावा लागेल. आदेशात म्हटलं आहे.प्राथमिक विमाधारक सदस्य हा महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत संलग्न, संबद्ध, प्रशासित, वर्गीकृत असलेल्या महाविद्यालये, संस्था किंवा विद्यापीठांमध्ये शिकणारा विद्यार्थी असणे आवश्यक आहे. सेकंडरी विमा सदस्य हा विद्यार्थ्याचा शाळा किंवा कॉलेजमधील प्रवेश अर्जावर नोंदणी असलेला पालक असेल.


विमा घेऊनही या घटनेत मिळणार नाही विम्याचा लाभ

आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न, गर्भधारणा किंवा बाळंतपण, मोटार रॅली किंवा साहसी खेळांमध्ये सहभाग, गृहयुद्धात सहभाग, नक्षलवादी हल्ला वगळता झालेले इतर दहशतवादी हल्ले, दारुच्या प्रभावाखाली झालेली दुर्घटना, ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे सेवन, विमा लाभार्थीकडून हत्या, न्यूक्लिअर रेडिएशन अशा घटनांमध्ये विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळणार नाही. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.