Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीसाठी कोकणात येताना टोलमाफीचा स्टिकर कसा मिळवाल? फक्त एवढंच करा...

गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी कोकणातल्या गणेशभक्त प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आनंदाची बातमी देण्यात आली आहे. गणेश उत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांसाठी टोलमाफी देण्यात आली आहे.

मुंबई-बेंगलोर हायवे आणि मुंबई-गोवा हायवेवरून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना 16 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर 2023 दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व टोलनाक्यांवर टोलमाफी देण्यात येणार आहे.

कसे मिळवता येईल टोलमाफीचे स्टिकर?

टोलमाफीचा स्टिकर मिळवण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौकी किंवा आरटीओ कार्यालयाला भेट देऊन आपल्यासोबत कोकणात जाणाऱ्यांची माहिती नोंदवावी लागेल. त्यानंतर आपल्याला टोलमाफीचा स्टिकर देण्यात येईल. हा स्टिकर परतीच्या प्रवासातही लागू असेल.

काही दिवसांपूर्वी महामार्गावरील कशेडी घाट बोगदा खुला करण्यात आला असून, या बोगद्यामुळे पोलादपूर ते कशेडी हे अंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटांत कापता येणार आहे. वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांचा जवळपास 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.