शिवशौर्य यात्रा : जागर जाज्वल्य इतिहासाचा


'शिवशौर्य यात्रेचा' दोडामार्ग येथे ३० सप्टेंबर रोजी शुभारंभ ; शिवप्रेमींनी सहभागी व्हावे

श्री शिव राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषदेचे हिरक महोत्सवी वर्ष या औचित्यावर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल, कोकण प्रांत यांच्यावतीने  'शिवशौर्य यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. 'शिवशौर्य यात्रा' "ही  दोडामार्ग येथून सुरु होऊन संपूर्ण कोकण प्रांतात परिक्रमा करणार आहे. शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ८ वा. यात्रेचा प्रारंभ होऊन 1 ऑक्टोबर ला संध्याकाळी खारेपाटण येथे पोहोचत त्यानंतर पुढील प्रवासाला मार्गस्थ होईल.

 यात्रेचा प्रवास

शनिवार दि.३० सप्टेंबर २०२३

दोडामार्ग : सकाळी ८.०० वा सुरू
बांदा      : सकाळी ११.००वा दर्शन थांबा
सावंतवाडी : दुपारी १२.०० ते २ दर्शन थांबा
कुडाळ       : दुपारी २.३० ते सायं ४.००वा.
मालवण    : सायं ५.०० वा कुंभारमाठ येथे आगमन, मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे सायं ७.०० वा.जाहीर सभा.

 रविवार दि.१ ऑक्टोबर २०२३

कणकवली : सकाळी १०.०० वा.दर्शन थांबा
नांदगाव     : दुपारी १२.३०वा.दर्शन थांबा
कासार्डे      : दुपारी १.१०वा.स्वागत थांबा
तळेरे         : दुपारी २.३०वा.स्वागत थांबा
खारेपाटण  : दुपारी ३.३० वाजता दक्षिण रत्नागिरी कडे यात्रा प्रस्थान.

यानंतर ही यात्रा दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत कोकण प्रांताचा प्रवास पूर्ण करणार आहे. शिवशौर्य यात्रा ही आपल्या जाज्वल्य इतिहासाचा जागर करणारी यात्रा आहे. या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल, कोकण प्रांत यांच्यावतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.