अमर रहे! शहीद सुभेदार सुनील सावंत यांना अखेरची सलामी


१९ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे सुभेदार सुनील राघोबा सावंत (46, रा. कारिवडे भैरववाडी) हे बुधवारी पंजाब येथे परेड सुरू असताना शहीद झाले. त्यांचे पार्थिव आज, शनिवारी कारिवडे या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले.

सुभेदार सुनील सावंत हे युनिट पंजाबमध्ये कार्यरत होते. नेहमीप्रमाणे जवानांची परेड सुरू होती. त्यावेळी धावताना सुभेदार सावंत चक्कर येऊन खाली पडले. त्यातच ते शहीद झाले. याबाबत सावंत कुटुंबियांना माहिती देण्यात आली. त्याचे काही नातेवाईक पंजाबकडे रवाना झाले त्यानंतर तेथील सर्व सोपस्कार पूर्ण करून शहीद सुनिल सावंत यांचे पार्थिव शूक्रवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दिल्ली, गोवा मार्गे त्याच्या मूळ गावी कारिवडे येथे आज, दुपारच्या सुमारास त्याचे पार्थिव दाखल झाले.

जिल्हा प्रशासन तसेच कारिवडे सरपंच आरती माळकर यांनी सुभेदार सावंत यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर शाळेपासून घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळकरी मुले, ग्रामस्थ, माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.