आरबीआयकडून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन

  • २ हजार रुपयांची नोट जमा करण्यास मुदतवाढ
  • ७ ऑक्टोबरपर्यंत नोटा जमा करण्यास मुदतवाढ
  • ७ ऑक्टोबरनंतर आरबीआयच्या कार्यालयात नोटा जमा करता येणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं आतापर्यंत जमा झालेल्या नोटांचा आढावा घेतल्यानंतर मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. आरबीआयच्या नव्या घोषणेनुसार ७ ऑक्टोबरपर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये बदलून घेता येतील किंवा जमा करता येतील. याशिवाय ८ तारखेपासून आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये नोटा जमा करता येणार आहेत. 

आरबीआयनं १९ मे रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजारांची नोट बँकेत जमा करण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळं आता वाढलेल्या ७ दिवसांच्या मुदतीत ज्यांच्याकडे गुलाबी नोटा असतील त्यांनी त्या बँकांमध्ये किंवा आरबीआयच्या प्रादेशिक केंद्रांत जमा कराव्यात.

आरबीआयनं १९ मे पासून बँकांमध्ये नोटा जमा करण्याची व्यवस्था केली होती. त्यासह देशभरातील आरबीआयाच्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये देखील नोटा जमा करण्याची व्यवस्था केली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.