माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांची जिल्हा आरोग्य अधिकारी पदी पदोन्नती -


                                                     -                    जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांची पदोन्नतीने सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांची सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी पदी बदली झाल्यानंतर डॉ. सई धुरी या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी पदी प्रभारी म्हणून काम पाहत होत्या.

राज्य शासनाने जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील बदल्यांचा शासन आदेश नुकताच जारी केला आहे. या आदेशानुसार जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांची सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी पदी बढती झाली आहे.          

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.