मुंबईतील गणपतींचे दर्शन आता एका क्लिकवर "हॅशटॅग बाप्पा" माध्यमातून



मुंबईतील गणेशोत्सव म्हंटला तर बाप्पाचा जयघोष आणि सार्वजनिक मंडळांची ऐट पहायला मिळते. मुंबईतील या गणेश मंडळाचे दर्शन एकाच क्लिक वर आता होऊ शकणार आहे. आपला उत्सव जागतिक दर्जावर पोहचवण्यासाठी आम्ही उचलेलं छोटसं पाऊल हे आहे. हॅशटॅग बाप्पा या संकेतस्थळाद्वारे ते शक्य होणार आहे.

मुंबईत चाळ संस्कृतीपासून ते टॉवरपर्यत प्रत्येकाच्या घराघरात आणि मंडळात बाप्पा विराजमान झालेले दिसून येतात. मुंबईतील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लागलेल्या असतात. सार्वजनिक गणेश मंडळांची वाढती प्रसिद्धी पाहता, ह्या सर्व गणपतींचे दर्शन घेण्यासाठी दहा दिवस देखील अपुरे पडतात. त्यामुळे राहून गेलेल्या तसेच घरबसल्या आपल्या आवडत्या मंडळातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी "हॅशटॅग बाप्पा" हे संकेतस्थळ ब्रँण्डमेकर या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहे.
 या संकेतस्थळामार्फत मुंबईतील कोणत्याही मानाच्या गणपतीचे एका क्लिकवर लाईव्ह दर्शन घेणे आता शक्य होणार आहे. क्यु आर कोड स्कँन करुन किंवा एन एफ सी कार्ड च्या माध्यमातून मुंबईतील कोणत्याही गणपती मंडळाची सविस्तर माहिती, मंडळाच्या उपक्रमांचा आढावा तसेच थेट प्रक्षेपण घेवू शकता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.