यंदाच्या गणेश चतुर्थीला लाँच होणार Jio Air Fiber

 


जिओने गणेश चतुर्थीला म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी जिओ एअर फायबर लॉन्च होणार असल्याची घोषणा केली आहे. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घरे आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करणार आहे.
Jio Air Fiber तसेच Jio True 5G डेव्हलपर प्लॅटफॉर्म आणि Jio True 5G लॅबला लॉन्च करण्याची घोषणा केलीय. एंटरप्राइझच्या गरजा लक्षात घेऊन Jio ने 5G नेटवर्क, एज कंप्युटिंग आणि अॅप्लिकेशन्स एकत्र करून एक सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. दुसरीकडे ‘Jio True 5G लॅब’ मधील आमचे तंत्रज्ञान भागीदारीच्या माध्यमातून उद्योगासाठी विशिष्ट समाधाने विकसित करणे, चाचणी आणि सह-निर्मित करू शकतात. Jio True 5G लॅब ही नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे असणार आहे, असंही जिओ ग्रुपने म्हटलं आहे.
दशलक्षाहून अधिक परिसर आमच्या ऑप्टिकल फायबर सेवेशी म्हणजेच जिओ फायबरशी जोडलेले आहेत. तरीही लाखो कॅम्पस आहेत, जेथे वायर कनेक्टिव्हिटी देणे कठीण आहे. जिओ एअर फायबर ही अडचण कमी करणार आहे. याद्वारे आम्ही २० कोटी घरे आणि परिसरांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करीत आहोत. Jio Air Fiber लाँच केल्यामुळे Jio दररोज १.५ लाख नवीन ग्राहक जोडण्यास सक्षम असेल.
खरं तर जिओचे ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण भारतात १५ लाख किमीपर्यंत पसरलेले आहे. सरासरी ऑप्टिकल फायबरचा ग्राहक दरमहा २८० जीबीपेक्षा जास्त डेटा वापरतो, जो Jio च्या दरडोई मोबाईल डेटा वापराच्या १० पट आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.