ISRO मध्ये शास्त्रज्ञ व्हायचंय? नेमकं काय करावे लागेल ?


भारताने चांद्रयान 3 मोहीम यशस्वी केली. आणि अवघ्या देशाने इस्त्रोचा जयजयकार सुरु केला. भारताच्या चंद्रावरील दिग्विजयाचं गमक त्याच्या वैज्ञानिक विचार बैठकीत आहे असा विचारप्रवाह जगभरात सुरु झाला आहे आणि या सगळ्याचे श्रेय जातय ते इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना. इस्त्रोच्या शास्त्रज्ञानी केलेल्या या अपार संशोधनामुळे आज भारताचे नाव जगात दुमदुमत आहे.  आणि म्हणूनच इस्त्रोबद्दल आज कुतुहल वाढले आहे. अनेक पालकांना आपल्याही मुलांना इस्त्रोमध्ये संशोधक बनवायचे वेध लागले आहे. पण इस्त्रोमध्ये नेमका कसा प्रवेश घ्यावा या प्रश्नांच्या उत्तरात सगळे शोधात आहे.


जर तुम्ही इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पहात असाल तर त्यासाठी तुम्हाला दहावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची गरज आहे. याकाळात तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे अनिवार्य विषय निवडा आणि त्याचा खोल अभ्यास करण्यास सुरूवात करा. दहावीनंतर या विषयांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा किंवा चाचणी पास होण्यास मदत होईल.


तसेच , इच्छुक विद्यार्थी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधून चालू शैक्षणिक काळात बीटेक देखील करू शकतात. अनेक नामांकित महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना एरोस्पेस अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये बीटेक करता येते. यामध्ये विद्यार्थ्याला पाच वर्षाच्या काळात B.Tech. + मास्टर ऑफ सायन्स/मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी असा दुहेरी अभ्यास करता येतो. त्यामुळे शास्त्रज्ञ होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय देखील योग्य ठरू शकतो.


तुम्हाला जर BTech किंवा BSc मध्ये रस असेल तर तुम्ही कॉलेजमार्फत होणाऱ्या प्रवेश परीक्षांमध्ये भाग घेऊ शकता. ज्यांना, BTech साठी ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी JEE किंवा JEE Advance करावे. भारतात या अभ्यासक्रमासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशी अनेक विविध कॉलेजेस उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Advanced आयोजित केले जाते. परंतु ज्यांना Bsc करायचे आहे त्यांनी केंद्रीय विद्यापीठाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट द्याव्यात.


ज्या तरुणांना ISRO सोबत काम करायचे आहे अशा तरुणांसाठी ISRO कडून कॅम्पस प्लेसमेंटमध्ये देखील आयोजित करण्यात येते. अशावेळी इस्त्रो थेट कॉलेजमधून योग्य उमेदवारांना आपल्यासोबत काम करण्याची संधी देते. तसेच , विविध पदे भरण्यासाठी देखील फ्रेशर्सचा विचार करते. यासाठी इच्छुक तरुणांना या क्षेत्रातील सर्व माहिती चे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच जे ISRO मध्ये काम करण्याची संधी शोधत आहेत त्यांनी सतत इस्रोच्या वेबसाइटला भेट द्यावी.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.