भारताची आता सूर्यभरारी, ISROचे नवे मिशन आदित्य एल वन



चांद्रयान ३ च्या यशस्वी लॅंडिंगनंतर आता भारत सूर्याकडे झेप घेणार आहे. आदित्य एल १ चे सप्टेंबरमध्ये प्रक्षेपण केले जाणार आहे. 


सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) सप्टेंबरमध्ये ‘आदित्य एल १’ यान अवकाशात सोडणार आहे. सूर्य आणि भोवतीच्या वातावरणाचा या मोहिमेत अभ्यास करण्यात येणार आहे. त्यामुळे, सुर्याविषयीची असणाऱ्या अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे.

 


 

सूर्याचा अभ्यास करणारी ‘इस्रो’ची ही पहिलीच मोहीम आहे. पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ‘लॅगरेंज पॉइंट १’पर्यंत हे यान नेण्यात येणार आहे. या ठिकाणाहून ग्रहण किंवा कोणत्याही अडथळ्याशिवाय सूर्याचे निरीक्षण करता येणार आहे. सूर्यावरील घडामोडी काही सेकंदांमध्ये पाहता येण्यासाठी या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. या यानावर सात उपकरणे असून, त्याद्वारे विविध निरीक्षणे नोंदविण्यात येणार आहेत.

 

या मोहिमेमध्ये ‘आदित्य एल १’ हे यान पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील ‘लो अर्थ ऑर्बिट’पर्यंत नेण्यात येणार आहे. हे अंतर पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणाहून कोणत्याही अडथळ्याशिवाय सुर्यावरील अडथळ्यांचा अभ्यास करता येणे शक्य होणार आहे. तसेच, तेथून पृथ्वीवर पाठविण्यात येणारे संदेशही अल्पावधीत पोहोचू शकतील.

 

आदित्य एल १‘ मोहिमेची उद्दिष्टे

- सूर्याच्या वातावरणाचा, त्यातील कोरोना आणि ‘क्रोमोस्फिअर’चा अभ्यास करणे
- सूर्यावरील घडामोडींमुळे वातावरणात निर्माण होणारी उष्णता, आयोनाइज्ड प्लाझ्मा आणि ज्वालांचा निरीक्षणे टिपणे
- सूर्यावरील कोरोना आणि उष्णता निर्माण होण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करणे; त्याच्याशी संबंधित चुंबकीय शक्तीविषयी निरीक्षणे नोंदवणे

- सौरवादळे आणि सौरस्फोट यांतून निर्माण होणाऱ्या ज्वालांच्या प्रक्रियांचे संशोधन करणे
- अवकाशातील वातावरणावर परिणाम करणाऱ्या सौर वाऱ्यांचा उगम, त्यातील घटक आणि अन्य घडामोडींचा अभ्यास करणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.