कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये डॉ.महेश केळुसकर लिखित क्रमशः कादंबरीचे अभिवाचन आणि चर्चा कार्यक्रम संपन्न


कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी विभाग आयोजित डॉ.महेश केळुसकर लिखित क्रमशः कादंबरीचे अभिवाचन आणि चर्चा हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.प्रसिद्ध साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांनी या कार्यक्रमात त्यांच्या क्रमशः कादंबरी मधील काही निवडक भागाचे अभिवाचन केले. तसेच विद्यार्थ्यांना कादंबरीच्या स्वरुपासंदर्भात , क्रमशःकादंबरीची निर्मिती प्रक्रिया व समकालीन संदर्भातही मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य ,प्राध्यापक तसेच  उपस्थित विद्यार्थ्यांनी क्रमशः कादंबरीवरील चर्चेमध्ये सहभाग घेतला. लेखक डॉ.महेश केळुसकर यांनी  विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

 क.म.शि.प्र.मंडळाचे सरकार्यवाह श्री.अनंत वैद्य यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.कला वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटचे प्रा.जगदीश राणे व गोगटे-वाळके महाविद्यालय पानवळ बांदाचे डॉ.एन.डी.कार्वेकर यांनी क्रमशःकादंबरीवर लिहिलेल्या आपल्या निबंधांचे वाचन केले. मुंबई विद्यापीठाच्या मराठीच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात डॉ. महेश केळुसकर यांची क्रमशः कादंबरी नेमलेली आहे.महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.शरयू आसोलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही बी झोडगे यांच्या हस्ते डॉ.महेश केळुसकर यांना स्मृतिचिन्ह ,भरारी वार्षिकांक,पुष्पगुच्छ तसेच निबंध वाचक प्रा.डॉ.एन.डी.कार्वेकर ,प्रा.जगदीश राणे यांचे स्मृतिचिन्ह ,भरारी वार्षिकांक,गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.मराठी विभागाच्या संयुक्ता तरंगे ,सुप्रिया सामंत,विनायक कर्पे, चैतन्य वेंगुर्लेकर आदी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.फोंडाघाट महाविद्यालयातील खुशी कामतेकर, सायली चव्हाण, दीपाली जाधव, आकांक्षा जाधव यांनीही चर्चेमध्ये सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष वालावलकर यांनी केले तर आभार  कॅप्टन प्रा.एस.टी.आवटे यांनी मानले.प्रा.पी.डी.जमदाडे , डॉ.ए.एन.लोखंडे,इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ.भारत तुपेरे,प्रा.डॉ.के.एम.चव्हाण, .डॉ.गावडे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.                                                       

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.