आता नियोजन नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचे ! काय होणार सिंधुदुर्ग जिल्ह्याला फायदा घ्या जाणून !

सध्या मुंबई गोवा चौपदरीकरण वेगाने सुरु आहे तर दुसरीकडे कोकणकिनाऱ्यावरून ग्रीनफिल्ड हायवेची लगबग सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता कोकणाला नवी समृद्धी देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचीही जोरात चर्चा आहे.

नागपूर आणि गोवा यांना जोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ एक्सप्रेसवेची घोषणा केली. या एक्स्प्रेस वेला शक्तीपीठ एक्सप्रेस वे असे नाव देण्यात आले आहे.या एक्सप्रेसवेमुळे महाराष्ट्रातील पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडील 3 शक्तीपीठे, 2 ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे जोडली जातील. वर्ध्यातील पवनार ते गोव्यातील पत्रादेवी या शक्तीपीठांना याद्वारे जोडले जात आहे. याशिवाय तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूर ही शक्तीपीठे, अंबेजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, गुरुद्वारा सचखंड श्री हजूर साहिब आणि प्रधानपूर येथील विठ्ठल कुमारी यासह इतर तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत.

यामुळे या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग हे नाव दिले गेले आहे. शक्तीपीठांसह विविध धार्मिक स्थळे जोडली गेल्याने धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. 


या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, कोकण हे तर जोडले जाणार आहेत, पण तिथूनही पुढे गोव्यापर्यंत हा एक्सप्रेसवे असणार आहे. या एक्स्प्रेस वेमुळे या दोन्ही ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ 21 तासांवरून 8 तासांवर येणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विदर्भ मराठवाड्यातुन थेट येणारा पर्यटक कमी वेळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात थेट येऊ शकणार आहे. 

शक्तीपीठ महामार्ग हा देवी भक्तांना देवी दर्शनासाठी प्रशस्त असा महामार्ग बनणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक देवी मंदिर आहेत, त्यामुळे या मंदिराकडे भाविक वर्ग सहज दर्शनाला येणे शक्य होणार असल्याने आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.