गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या अध्यक्ष पदी श्री विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांची एकमताने निवड.


गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या हॉटेल श्री महाराज मालवण येथे मंगळवार दिनांक 22/8/23 रोजी संपन्न झाली यावेळी सभेचे सूत्रसंचालन श्री गंगाराम आडकर सर यांनी केले त्यावेळी गाबीत मच्छिमार फेडरेशन समाजाच्या सहकार,सामाजिक,आर्थिक समस्यांना सोडविण्यासाठी कार्य करणार असून फेडरेशन स्थापन करण्यासाठी उपस्थितीत सर्वांचे आभार मानले तसेच फेडरेशन स्थापना उद्देशा विषयी गाबीत फिशरमेन फेडरेशन संयोजक श्री विष्णू मोंडकर यांनी माहिती दिली.

गाबीत समाज प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या 121 किलोमीटर किनारपट्टीवर 25000 पेक्षा जास्त कुटूंबे सागरी किनारपट्टीवर राहत असून राज्याची राजधानी मुंबई व हा समाज वास्तव्यास आहे .या समाजाचा पारंपरिक व्यवसाय मासेमारी हा असून या प्रमुख व्यवसायामध्ये हा समाज कार्यरत आहे महाराष्ट्र राज्यांच्या गोवा ,कर्नाटक,गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर मुळे देशाच्या परकीय चलनात वाढ होत असताना मात्र हा समाज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मूलभूत गरजांसाठी प्रशासकीय पातळीवर धडपडत आहे.समाजाच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या माध्यमातून संघटित होऊन काम करण्याचे सभेमध्ये ठरविण्यात आले तसेच गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या अध्यक्ष पदी श्री विष्णू मोंडकर यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की समाजाच्या सहकार ,आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य, डिझेल इंधनाबरोबर पेट्रोल वर अनुदान,मत्सव्यवसाय कार्यक्षेत्रात मच्छिमार शाळेची पुनःउभारणी ,सीआरझेड,सागरी बंधारे ,रापण व्यावसायिकांचे प्रश्न ,ब्रेक वॉटर प्रकल्प,फिश प्रोसेसींग युनिट ,गाबीत समाज भवन ,फिशरमन कल्चर सेंटर ,सरकारी जागेत राहत्या व्यवसाय ,घराच्या जागेचा प्रश्न,मच्छिमार महिलांचे प्रश्न,मासे विक्री करताना असुविधा ,गाबीत समाजासाठी केंद्र व राज्य सरकारच्या शासनाच्या अनेक आर्थिक योजनांमध्ये गाबीत समाजावर होणारा अन्याय दरवर्षी मच्छिमार बंदरे ,बंधारे योजनेसाठी मंजूर झालेला अखर्चित राहाणारा निधी ,तसेच प्रामुख्याने गाबीत समाजाच्या जात पडताळणी प्रश्न अश्या अनेक विषयावर गाबीत फिशरमेन फेडरेशन कार्य करणार असून स्थानिक प्रशासन राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी कार्य केले जाणार आहे तसेच गाबीत समाजाच्या या समस्या सोडविण्यासाठी समाजाच्या अनेक संघटना सोबत घेऊन संघटीत पणे काम करण्याची भूमिका मांडली तसेच लवकर सर्वांच्या सहमतीने फेडरेशन ची कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे सांगितले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.