शिवभक्तांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. उष्माघातापासून बचाव व्हावा यासाठी अगदी रायगडाच्या पायथ्यापासून ते रायगडावर वैद्यकीय मदत केंद्र तयार करण्यात आले आहेत. 25 वैद्यकीय मदत केंद्रात साडे तीनशे अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. रायगडाच्या पायथ्यापासून अगदी गडावर प्रत्येक पाचशे मीटरवर वैद्यकीय मदत केंद्र तयार केले जाणार आहेत. शिवाय उपचारांसाठी आयसीयू बेड्स आणि अॅम्ब्युलन्स सुद्धा तयार ठेवण्यात येणार आहे.रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे.
Shivrajyabhishek Din 2023 : शिवप्रेमींसाठी रायगडाच्या पायथ्यापासून गडावर प्रत्येक पाचशे मीटरवर वैद्यकीय यंत्रणा सज्ज
June 01, 2023
0
Tags