गरजेची न्यूजलिंक : मुंबईला एका दिवसासाठी आलात? मिटला राहण्याचा प्रश्न !

कामानिमित्त गावाहून मुंबईला एकादिवसा किंवा काही तासासाठी येणाऱ्या अनेकांना रहायचे कुठे हा प्रश्न सतावत असतो. म्हणजे अवघ्या काही तासासाठी हॉटेल बुक करणे।हे मनाला पटत नसते. नातेवाईकांकडे जाणे हा पर्याय स्वस्त असला तरी वेळच्या गणितात परवडत नाही. म्हणूनच रेल्वेने सुरू केलेल्या स्लीपिंग पॉडसची चर्चा आता वाढलीय

काय आहेत स्लीपिंग पॉडस ?

स्लीपिंग पॉड्स म्हणजे प्रवाशांना राहण्यासाठी लहान खोल्या आहेत. हे लहान कॅप्सूलसारखे आहेत. त्याची किंमत रेल्वेवरील सध्याच्या वेटिंग रूमपेक्षा थोडी कमी आहे, परंतु यामध्ये प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार सर्व सुविधा मिळतात.

स्लीपिंग पॉडसमध्ये काय सुविधा मिळतात ?

रेल्वेच्या या स्लीपिंग पॉड्समधील एअर कंडिशनर रूममध्ये राहण्यासोबतच प्रवाशांना इतरही अनेक सुविधा मिळणार आहेत. यामध्ये मोबाईल फोन चार्जिंग, लॉकर रूम, इंटरकॉम, डिलक्स बाथरूम आणि टॉयलेट इत्यादी सुविधा असतील.

कुठे आहे नेमकं लोकेशन ?

हे नवीन रेल्वे स्लीपिंग पॉड हॉटेल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या मेन लाइन वेटिंग रुमजवळ उघडले आहे. त्याचे नाव Namah Sleeping Pods आहे.

भारतीय रेल्वेने सांगितले की, सध्या मुंबई सीएसएमटी येथे एकूण 40 स्लीपिंग पॉड्स आहेत. यात 30 सिंगल पॉड्स, 6 डबल पॉड्स आणि 4 फॅमिली पॉड आहेत.

बुकिंग कसे करावे?

तुम्ही मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर बनवलेले हे Namah Sleeping Pods तुम्ही मोबाइलवर ऑनलाइन किंवा काउंटरवर जाऊन दोन्ही माध्यमातून बुक करू शकता.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.