नवी मुंबईतील उलवेमध्ये साकारणार तिरुपती बालाजी मंदिर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन



आता तिरुपती बालाजी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आंध्रप्रदेशात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेला आता नवी मुंबईतच तिरुपती बालाजीचं दर्शन घेता येणार आहे.नवी मुंबईतल्या उलवेनोडमध्ये तिरुपती बालाजीचं भव्य मंदिर बांधण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  सकाळी सकाळीच प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, नवी मुंबईतील आमदार, खासदार आणि स्थानिक नेते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.तिरुपती तिरुमाला बालाजी संस्थानच्या वतीने हे मंदिर उभारण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाच या मंदिराच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज भूमिपूजन सोहळा पार पडला.

तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर नवी मुंबईत श्री व्यंकटेश मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये हे मंदिर उभारलं जात आहे. देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती नवी मुंबईत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या सहकार्यानं नवी मुंबईतील उलवे नोड येथील जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकारनं 500 कोटी रुपयांची 10 एकर जागा नवी मुंबईत बालाजी मंदिर उभारण्यासाठी दिली आहे. त्यामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.