संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर लालबागच्या राजाचे पाद्यपूजन


लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९०व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्टी चतुर्थी बुधवारी (ता. ७) मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्स रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या हस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत पार पडले.


दरम्यान, खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचेही पूजन केले. पाद्यपूजनानंतर ​​लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरुवात होणार आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बुधवारी पहाटे साधेपणाने हे पाऊलपूजन केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.