देह पांडुरंग, कवच पांडुरंग



आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचा आनंद सोहळा.. अवघा 
घरादाराचा पांडुरंगावर भरोसा ठेवून पंढरीच्या वाटेवर निघणाऱ्या वारकऱ्यांसाठी यंदाची आषाढी ही एकादशीपुर्वीच पावन झालीय असेच म्हणावे लागेल. आणि याला कारण ठरले आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केलेली 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना'.. मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांना विम्याची घोषणा करत वारकऱ्यांना विमाकवच प्रदान केले आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. 

 ➡️ शिंदे सरकारकडून वारकऱ्यांना मिळणार 'विमा संरक्षण' ! 

➡️राज्य सरकारची वारकऱ्यांसाठी 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना' 

➡️वारीच्या ३० दिवसांसाठी मिळणार  विमा संरक्षण 

➡️'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजने’तून दुर्दैवी घटनेपासून मिळणार विमा संरक्षण 

➡️वारीत मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये 

➡️वारीत अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये 

➡️वारीत अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये

➡️वारी दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपये लागू करणार 

यंदा पहिल्यांदाच वारीच्या वाटेवरील वारकऱ्यांना विमा कवच प्रदान झाल्यामुळे केवळ वारकऱ्यांकडूनच नाही तर अवघ्या महाराष्ट्राकडून समाधान व्यक्त होत आहे. वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करतांना सांगितले.विम्यासोबतच यंदा राज्य सरकारने वारीसाठी कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत अनेक सुविधांची घोषणा केली आहे. 

राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी ‘महाआरोग्य शिबीर’

◆ वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी होणार आरोग्य शिबिरांचे आयोजन
◆आरोग्य शिबीराच्या माध्यमातून २० लाख भाविकांची आरोग्य तपासणी 
◆आरोग्य शिबीरासाठी  १ हजार ५०० आरोग्य अधिकारी पंढरपुरात तैनात

आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचा अमृत सोहळा.. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनाएवढाच आनंद वारकऱ्यांच्या दर्शनाने आणि सेवेने मिळतो. राज्य सरकारने वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना पंढरीच्या वाटेवर समाधानाची सेवा देण्यासाठी नियोजन केले आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना' घोषित करुन प्रशासनाच्या नेतृत्वाच्या वेगळेपणाची मोहोर उमटवली आहे. आरोग्य शिबीर, एसटीच्या सेवा, पंढरपूरातील मंदिर परिसरात सेवा सुविधांचा विस्तार आणि सोबतच वारीसाठी सज्ज असणारी संपुर्ण प्रशासकीय यंत्रणा या पंचसुत्रीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असणारी प्रत्यक्ष नजर यामुळे यंदाची वारी ही वारकऱ्यांसाठी आनंदाचा अक्षय ठेवा असणारी आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.