दिमाखात रंगला शाळा प्रवेशाचा सोहळा, कट्ट्याच्या वराडकर हायस्कुलला मिळतेय विद्यार्थ्यांची पसंती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल  व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावर्षी पहिल्याच दिवशी जवळपास ९० विद्यार्थ्यांनी शाळेत नवीन प्रवेश घेतला. या मुलांच्या स्वागतासाठी कट्टा बाजारपेठेतून  भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात ढोल, ताशा पथकासह मिकी माऊस,जोकर, बाल गणेशा,हत्ती यांच्या वेशभूषातील विद्यार्थ्यांनी मुलांचे मनोरंजन केले. औक्षण करून फुलांचा वर्षाव करून सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे प्रशालेमध्ये स्वागत करण्यात आले. तसेच सर्व नवीन विद्यार्थ्यांना प्रशालेमार्फत भेटवस्तू पाठ्यपुस्तके देऊन मुलांचा शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय केला.


या कार्यक्रमासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, उपाध्यक्ष शेखर पेणकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच  सचिव श्री सुनील नाईक सचिव श्रीमती विजयश्री  देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, खजिनदार श्री श्याम पावसकर ,सहसचिव  साबाजी  गावडे, संचालक महेश वाईरकर, वराडकर हायस्कूल  व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक  श्री संजय नाईक पर्यवेक्षिका सौ देवयानी गावडे, व सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी  पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्यानिमित्ताने विशेष सेल्फी पॉईंट उभारलेला होता जिथे नवीन विद्यार्थी व पालकांनी स्वतःचा सेल्फी घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.