बिळवस जलमंदिर : जत्रेची तारीख ठरली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या बिळवस येथील सातेरी जलमंदिराचा आषाढी जत्रोत्सव यंदा शनिवार 8 जुलै 2023 ला पार पडणार आहे. कसबा मसुरे गावची मूळमाया, आदिदेवता, कुलस्वामीनी श्री देवी सातेरीचा भक्तभविकगण हा केवळ मसुरे पंचक्रोशी , मालवण पुरताच मर्यादित नसून राज्यभर पसरलेला आहे. त्या सर्व भक्त भाविकगणांसाठी हा उत्सव महत्वाचा मानला जातो.

जाणून घेऊया बिळवस येथील सातेरी जलमंदिराबद्दल..


कोकणात सातेरी देवीची मंदिरे अनेक, परंतु मालवण तालुक्यातील बिळवस सातेरी मंदिर हे अधिक प्रसिद्ध आहे, कारण कोकणात आढळणाऱ्या सातेरी देवींच्या मंदिरांपैकी ते एकमेव असे जलमंदिर आहे – त्या देवीचा आषाढ महिन्यात जत्रोत्सव होतो. 

बिळवसची आई सातेरी ही  मसुरे गावातील बारा वाड्यांची ग्रामदेवता आहे. श्री सातेरी देवीचे जलमंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वी उभारले आहे. जैन घराण्यातील एका देवी भक्ताने ते बांधले असा समज आहे. 

सातेरी देवी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात. मंदिरामधील वारूळ मंदिराचाच अविभाज्य भाग, म्हणजेच देवी आहे. देवीचे वास्तव्य त्या वारुळात आहे. कोकणात वारूळ आणि सातेरी देवस्थान असे नाते श्रद्धेय मानले जाते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.