सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानबद्दल राज्य शासनाच्यावतीने ग्रामपंचायत स्तरावर जाहीर केलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार सौ. नेहा गणेश कोळंबकर (रा. कोळंब) व सौ. यशश्री यशवंत चव्हाण रा. कातवड यांना कोळंब सरपंच सौ. सिया रामचंद्र धुरी व उपसरपंच विजय भिवा नेमळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी ग्रा.पं. सदस्य नंदा बावकर, मेघना शेलटकर, प्राची पेडणेकर, पाताडे, व ग्रामस्थांच्या उपस्थित संपन्न झाला. महिला व बालविकास विभाग सिंधुदुर्ग व ग्रा.पं.कोळंब यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न झाला.