Atal Pension Yojana : सरकारकडून मिळणार प्रत्येक महिन्याला 5000 रुपये !

सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळण्याचे स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी २०१५ पासून अटल पेंशन योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हालाही ५००० रुपये मिळू शकतात.

कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या सामाजिक-आर्थिक गोष्टींची काळजी घेत असताना केंद्र सरकारची अटल पेंन्शन योजना चालू आहे. या योजनेअंतर्गत एका निश्चित वयानंतर महिना ५००० रुपये मिळू शकतात.

या योजनेची माहिती लोकांपर्यंत झपाट्याने पोहोचताना दिसत आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार मार्च २०२३ पर्यंत नॅशनल पेंशन योजना, एनपीएस लाइट, अटल पेंशन योजना या योजनेतील सदस्यांची संख्या ६२४.८१ लाख झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ पासून सुरुवात या योजनेची झाली आहे. या योजनेच ध्येय आहे की, सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्र करुन ६० वयानंतर महिना ५००० रुपयांची मदत करण्यात यावी.

अटल पेंशन योजनेची रक्कम घेताना कमीत कमी ४२ रुपये तर जास्तीत जास्त १४५४ रुपयांची गुंतवणूक वयाच्या ६० वर्षापर्यंत करावी लागेल. जर तुम्ही ४२ रुपयांची गुंतवणूक करत असाल तर ६० व्या वर्षी १००० रुपये प्रतिमहिना मिळेल आणि जर १,४५४ रुपये भरत असाल तर महिना ५००० रुपये मिळतील.

समजून घ्या अटल पेन्शन योजना

  • योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कर्मचाऱ्यांचे वय १८ ते ४० वर्ष असायला हवे.

  • या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत (Bank) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते खोलू शकतात

  • प्रत्येक महिना तुम्हाला हवी असलेली रक्कम भरण्यास सुरवात करु शकतात. यानंतर ६० वर्षानंतर तुम्हाला ही रक्काम १००० ते ५००० ह्या आधारे मिळेल.

  • अटल पेंशन योजना ही दिवसेंदिवस लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

  • २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ वर्षात २० टक्के जास्त लोकांनी या योजनेत नाव गुंतवले आहे.

  • आतापर्यंत ८.९२ टक्के लोकांनी या योजनेत पैसे गुंतवण्यास सुरुवात केली आहे आणि २८,४३४ कोटींपेक्षाही जास्त गुंतवणूक झाली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.