5 जी टॉवर ला गती येणार, खासदार विनायक राऊत यांनी घेतली सीजीएमची भेट


खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच BSNL महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलचे CGM मा.श्री.रोहित शर्मा यांची भेट घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित दूरसंचार सेवेविषयी चर्चा केली. या भेटीतील चर्चेमुळे जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी संदर्भात अनेक प्रश्न मार्गो लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील BSNL टॉवर्सना आवश्यक असलेल्या बॅटरिंची व इतर इक्विपमेंटची जोड मिळावी, तसेच सातत्याने बंद पडणाऱ्या टॉवर्सची यंत्रसामग्री नवीन बसवावी, जेणेकरून कोकणवासीयांना मोबाईल कनेक्टीविटी मध्ये अडथळा निर्माण होणार नाही आणि नवीन  मंजूर झालेल्या 4G टॉवर्सचे काम लवकरात लवकर सुरू करावे, या व इतर मागण्यांसाठी खासदार विनायक राऊत यांनी।आपली भूमिका मांडली.

दरम्यान या भेटीनंतर BSNL महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलचे CGM मा.श्री.रोहित शर्मा यांनी आवश्यक असलेल्या सर्व उपकरणांची लवकरात लवकर पूर्तता करण्यात येईल, तसेच वारंवार बंद पडणाऱ्या टॉवर संबंधित तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.