लगबग शिवराज्याभिषेक सोहळ्याची

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता सोहळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे.



छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात रायगडावर साजरा केला जात असताना भारताबाहेरील इतर ठिकाणीही कार्यक्रम साजरे होणार आहेत. मॉरिशसमध्ये मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट, कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली अर्जून पुतळाजी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनाच्या संदर्भात अशा प्रकारचा पहिला कार्यक्रम हा ४ जून २०२३ रोजी एका नदीतील गणेश पावन मंदिर येथे शिवाजी महाराजांच्या १४ फूट फायबर पुतळ्याच्या अनावरणाचा होईल. यावेळी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांसह सुमारे १०० कलाकारांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रमही सादर होणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.