पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील ५० गावांमध्ये भव्य व सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री महाजन यांनी या ५० गावात सामाजिक सभागृह उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली . या माध्यमातून जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, नंदुरबार, पुणे, नांदेड, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, नागपूर आदी जिल्ह्यांतील गावांची निवड करण्यात आली असून लवकरच बांधकाम करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. महाजन यांनी दिली. राज्यभरातुन निवडलेल्या पन्नास गावांमध्ये यावेळी कणकवली तालुक्यातील तरंदळे गावातील वाडीचा समावेश असल्याची माहिती मिळतेय.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहासाठी निवडण्यात आलेल्या गावातील ग्रामपंचायतींच्या वतीने सभागृह बांधण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. याठिकाणी सुसज्ज ५० सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहेत.