पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 27 मे रोजी संतांच्या हस्ते बहुचर्चित सेंगोल स्वीकारलं. हे सेंगोल नवीन संसद भवनामध्ये 28 मे रोजी स्थापित करण्यात येणार आहे. तमिळ परंपरेनुसार हा स्थापना समारोह होणार आहे.
थम्बीरन स्वामी यांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांना हे सेंगोल दिलं होतं. त्यांनी ते पुन्हा थम्बीरन स्वामी यांना भेट दिलं. त्यानंतर पारंपारिक संगीत आणि शोत्रायात्रा काढून हे सेंगोल पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं. थम्बरीन स्वामी यांनी सत्ता हस्तांतरणाचं प्रतिक म्हणून सेंगोल नेहरुंना भेट दिलं होतं.१९४७मध्ये सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतिक म्हणून हे सेंगोल तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेलं होतं. तो एक राजदंड आहे. अलाहाबादच्या संग्रहालयात हे सेंगोल ठेवण्यात आलेलं होतं. ५ फूट लांब आणि ८०० ग्राम वजन असलेलं सेंगोल न्यायाचं प्रतिक मानलं जातं. तमिळमध्ये सेंगोलला समृद्धी आणि संपन्नतेचं प्रतिक समजलं जातं.
सेंगोल म्हणजं साम्राज्याचं आणि सामर्थ्याचं प्रतिक. चेन्नईतील वुमुडी बंगारु ज्वेलर्स अर्थात VBJ यांनी याबद्दल माहिती दिली आहे. व्हीबीजेचे व्यवस्थापकीय संचालक अमरेंद्रन म्हणाले की, २०१८ मध्ये आम्ही एका मासिकमध्ये सेंगोलबद्दल वाचलं होतं. त्यापूर्वी आम्हांला याबद्दल काहीही माहिती नव्हती. २०१९ मध्ये संग्रहालयात याबद्दल सर्व माहिती मिळाली. अहलाबाद संग्रहालयामध्ये ही सेंगोल होती. याचा एक व्हीडिओ आम्ही बनवला आणि पंतप्रधानांकडे पाठवला, असं अमरेंद्रन यांनी सांगितलं.