अर्थसंकेत संस्थेचा दहावा वर्धापनदिन विकोचे संचालक श्री संजीव पेंढारकर, एस आर एल डायग्नोस्टिकचे डॉ. अविनाश फडके, मुंबई विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. दिलीप पाटील, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना बागवे यांच्या उपस्थितीत शनिवार २० मे २०२३ रोजी श्री. शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे साजरा करण्यात आला.
गेल्या दहा वर्षांत अर्थसंकेतने लाखो उद्योजकांना मार्गदर्शन केले आहे. सर्वसामान्यांना उद्योजकतेकडे वळण्यास प्रेरित केले आहे. महाराष्ट्रीय उद्योग जगतात आणि मानसिकतेत बदल घडविण्यात अर्थसंकेतचा मोलाचा वाटा आहे.
मराठी समाजात आर्थिक व उद्योजकीय साक्षरता निर्माण व्हावी व जास्तीत जास्त मराठी समाज उद्योकतेकडे वळावा हे अर्थसंकेत या संस्थेचे उद्धिष्ट आहे.
कार्यक्रमात ‘व्यवसाय वाढीसाठी Chat GPT चा उपयोग’ व ‘पुढील पिढीसाठी व्यवसायाचे व्यवस्थापन’ या विषयांवर वेलिंगकर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट संस्थेच्या तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी श्री. संतोष बच्छाव, श्री. हृषीकेश देशपांडे व आत्मया फार्म्स यांचा 'महाराष्ट्र उद्योग गौरव' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच श्री मकरंद शेरकर, श्री गुणाकार अन्वेकर, श्री जलज पिंगळे व इनोव्हेटिव्ह लाउंड्री बास्केट यांचा 'नवं उद्योजक' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.