हापूस लै लो, आता कारवाईचा बडगा


● कर्नाटक हापूस ला देवगड हापूसचे बॉक्स नको
● ज्या राज्यातून आंबा येतो त्याच नावाने आंबा विका
● परप्रांतीय विक्रेत्यांच्या आंबा विक्रीवर यंदा करडी नजर


पर राज्यातील आंबा हा महाराष्ट्रातील हापूस आंबा असल्याचे सांगून विक्री केल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा कडक इशारा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ बाजाराच्या उपसचिवांनी दिली आहे.

बाजार समिती आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांनी वारंवार कारवाई केल्याने या प्रकाराला काही प्रमाणात आळा बसला असला तरी अजूनही काही प्रमाणात हापूस फसवणुकीचे प्रकार चालूच असल्याचे बाजार समितीच्या निदर्शनास आले आहे.

कोकणातून सार्वधिक आंब्याची आवक फळ बाजारात होते. त्यापाठोपाठ गुजरात, आन्ध्र प्रदेश, कर्नाटक येथूनही आंबा विक्रीसाठी येतो. अन्य आंब्यांच्या तुलनेत कर्नाटकी आंबा कोकणातील हापूस आंब्या सारखाच दिसतो. काही व्यापारी कर्नाटकी आंबा हापूस आंब्याच्या नावाने विकत आहेत.

मागील काही वर्षांपासून फळ बाजारातील व्यापारी नफा कमावण्याच्या हेतूने पर राज्यातून येणारे आंबे हापूस आंब्याच्या नावाने विकत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील हापूस आंब्याचे नाव खराब होत आहे. तसेच ग्राहकांची फसवणूक होऊन बाजार समितीच्या नावालाही तडा जात आहे. याची नोंद घेत परराज्यातून येणारे आंबे हापूस म्हणून विक्री करू नका अशी सूचना बाजार समितीने व्यापाऱ्यांना केली आहे. ज्या राज्याहून आंबा येतो, तो त्याच राज्याच्या नावाने विकावा असे आदेश बाजार समितीने दिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.