महालक्ष्मी सरस यंदा नवी मुंबईत

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने  (उमेद) नवीमुंबईत पहिल्यांदा वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी दि. 8 ते 19 मार्च 2023 या कालावधीत राज्यस्तरीय “महालक्ष्मी सरस प्रदर्शन-2023” चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत आहे.


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2023 रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.अशी माहिती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी आज सिडको भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


दरवर्षी मुंबईतील बांद्रा या ठिकाणी भरविण्यात येणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन यंदा नवीमुंबईत भरविण्यात येत असल्याने नवी मुंबईकरांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.या प्रदर्शनामध्ये साधारण ५११ स्टॉल असणार आहेत. यात महाराष्ट्रातील ३५०, देशभरातून ११९, तसेच नाबार्डचे ५० स्टॉल आहेत.


नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पनवेल शहरातील नागरिकांना प्रदर्शनाचा आरामदायी अनुभव घेता यावा याकरिता संपूर्ण प्रदर्शन वातानुकूलित असणार आहे. त्याचप्रमाणे सहकुटुंब भेट देणाऱ्या कुटुंबांचा विचार करून लहान मुलांना खेळवाडी ( प्ले एरिया) उभारण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय मीलेट (भरडधान्य) वर्ष लक्षात घेऊन स्वतंत्र मिलेट दालन यात असणार आहे. खात्रीचे आणि प्रमाणित असे सेंद्रिय पदार्थ शहरवासीयांना या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.