देशभर नव्या फ्लूची साथ; 'आयसीएमआर', 'आयएमए'च्या मार्गदर्शक सूचना

दिनांक : 3 मार्च 2023

देशभर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून फ्लूसदृश लक्षणे असलेल्या आजाराची साथ पसरली असून हा फ्लूचाच एक प्रकार असल्याचे आणि 'फ्लू ए'चा उपप्रकार 'एच३एन२' या विषाणूमुळे त्याचा प्रादुर्भाव होत असल्याचे आयसीएमआर शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.


लक्षणे काय आहेत ?

सर्दी, खोकला आणि कधी कधी जोडीला ताप.

तापाबरोबरच मळमळ, उलटय़ा, घसादुखी, अंगदुखी, अतिसार.

ताप तीन दिवसांनी जातो, तर खोकला तीन आठवडय़ांपर्यंत राहू शकतो.

सतत खोकला आणि कधी कधी त्याच्या जोडीला ताप ही या आजाराची लक्षणे आहेत. फ्लूच्या इतर उपप्रकारांपेक्षा 'एच३एन२'मुळे रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्दी, खोकला आणि तापाबरोबरच मळमळ, उलटय़ा, घसादुखी, अंगदुखी, अतिसार ही या आजाराची अन्य लक्षणे आहेत. हा ताप तीन दिवसांनी जातो, तर खोकला मात्र तीन आठवडय़ांपर्यंत राहू शकतो, असे 'आयएमए'च्या समितीने सांगितले.

काय करू नये?

– हस्तांदोलन करू नये, स्पर्श टाळावा.

– सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

– स्वत:हून औषधे घेऊ नयेत.-

– डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रतिजैवके आणि इतर औषधे घ्यावीत.

– इतरांच्या अगदी जवळ बसून खाणे टाळावे


या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यत: हवेतून होत आहे. १५ पेक्षा कमी आणि ५०हून अधिक वयाच्या रुग्णांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक आहे. विषाणूचा संसर्ग श्वासनलिकेच्या वरील भागाला होतो आणि ताप येतो, हा आजार जीवघेणा नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले असले तरी काही रुग्णांच्या बाबतीत श्वसनयंत्रणेला संसर्ग होत असल्याने रुग्णालयात दाखल करावे लागूू शकते.


काय करावे?

-हात नियमितपणे साबण आणि पाण्याने धुवावेत. मुखपट्टीचा वापर करावा, गर्दीची ठिकाणे टाळावीत.

-नाक आणि तोंडाला हात लावणे टाळावे.

-खोकताना, शिंकताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाकावे.

-पाणी पीत राहावे, भरपूर द्रवपदार्थाचे सेवन करावे.

-ताप आणि अंगदुखी असल्यास पॅरासिटामॉल घ्यावी.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.