१४ फेब्रुवारीच्या निमित्ताने आता देशभर सोशल मीडियावर आणि तरुणाईमध्ये प्रेमाचा रंग पसरताना दिसतोय, त्यातच आता केंद्र सरकारने १४ फेब्रुवारीसाठी एक मोठी घोषणा केलीय. आज पर्यंत हिंदू संघटना या व्हॅलेंटाईन डे दिवशी आक्रमक होऊन संस्कृती संवर्धनसाठी जागर करायच्या. यंदा मात्र या प्रयत्नांना} यश आल्याचे दिसतय. केंद्र सरकारने १४ फेब्रुवारी दिवशी एका नव्या दिवसाची घोषणा करण्यात आलीय.
14 फेब्रुवारी हा 'व्हॅलेंटाईन डे' अर्थात जागतिक प्रेमदिन म्हणन सर्वत्र साजरा केला जातो. मात्र केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने १४ फेब्रुवारी हा दिवस 'काऊ हग डे' अर्थात 'गाईला आलिंगन दिन' म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. तसे या संदर्भात पत्र देखील या विभागाकडून काढण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव डॉ.एस.के.दत्ता यांनी हे पत्रक काढून निर्देश दिले आहेत. या पत्रात ते म्हणाले की, गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा बाजू आहे. गाय ही पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. सोबतच मानवी जीवन टिकवते, सर्व ऐश्वर्य प्रदान करणारी, आईसारख्या प्रेमळ स्वभावामुळे गायीला 'कामधेनू' आणि 'गौमाता' म्हणून ओळखले जाते.
काळानुसार पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरला आहे.
गाईचा प्रचंड फायदा पाहता, गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते. त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो. त्यामुळे सर्व गाईप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन गाईला आलिंगन दिन म्हणून साजरा करावा आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करावे. असे ते म्हणाले या पत्रात म्हणाले आहे. परंतु, आता या पत्राची प्रचंड चर्चा होत आहे.